पिंपरी / चिंचवड

बसची वाट पाहत थांबलेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावला

पिंपरी l प्रतिनिधी

सकाळी साडेसहा वाजता कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 3) सकाळी साडेसहा वाजता संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

गोपीनाथ शिवाजी थोरात (वय 46, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थोरात हे गुरुवारी सकाळी कामावर जाण्यासाठी संभाजीनगर येथील काका हलवाई स्वीट दुकानासमोर थांबले होते. सकाळी साडेसहा वाजता ते बसची वाट पाहत थांबले असताना एका दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी थोरात यांच्या हातातील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button