breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी प्राधिकरणात लोकमान्यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना

  • माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या पाठपुराव्याला यश
  • प्रशासन स्तरावरील कामकाज झाले गतीमान

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहराची कामगारनगरी ते उद्योगनगरीकडे वाटचाल होऊन कित्येक वर्षे लोटली. मात्र, महापुरूषांचे पुतळे गेल्या कित्येक वर्षांपूर्वीपासून अडगळीत पडले आहेत. निगडी प्राधिकरणातील लोकमान्य टिळकांचा गेल्या तीस वर्षापूर्वीचा पुतळा हटवून त्याठिकाणी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीला शोभेल असा विलोभनिय पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून पुतळा बसविण्याचे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे.   

निगडी प्राधिकरण येथे लोकमान्य टिळकांचा पुतळा हा आकर्षक व रुबाबदार असावा या हेतूने माजी उपमहापौर व नगरसेविका शैलजा मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पुतळा परिसर सुशोभिकरण करणेकामी प्रशासकीय स्तरावर अथक प्रयत्न केले आहेत. लोकमान्य टिळकांचा पुतळा कसा असावा याचे संकल्पचित्र मांडण्यासाठी त्यांनी पुणे महापालिकेच्या माजी महापौर व विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांचे मार्गदर्शन घेतले आहे. प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून हे काम मार्गी लावण्यासाठी उपमहापौर मोरे यांनी पाठपुरावा केला आहे. आता लवकरच निगडी प्राधिकरण येथील लोकमान्य टिळक चौकात टिळकांचा रुबाबदार पुतळा प्रस्थापित होणार आहे.


निगडी प्राधिकरणातील टिळक चौकात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ३० वर्षे जुना पुतळा पुनर्स्थापित केला जाणार आहे. तसेच, पुतळा परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. नवीन पुतळा ३ फूट उंचीचा अर्धाकृती असणार आहे. पुतळ्याचे वरती GRC मेघडंबरी करण्याचे नियोजन आहे. सध्या स्थापत्य विभागामार्फत पुतळ्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यात येत आहेत.

शैलजा मोरे, मा. उपमहापौर, पिंपरी-चिंचवड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button