Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकमध्ये मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या; ‘सुफी बाबा’च्या मृतदेहाजवळ सापडलं कुंकू आणि नारळ

नाशिकः चिचोंडी औद्योगिक परिसरात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अफगाणी तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी मयत तरुणाचा मित्र गफार आणि आणखी एकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असे मयत अफगाणी तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या हत्येनंतर घटनास्थळावरुन चार अज्ञात संशयितांनी चारचाकी गाडीतून पोबारा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, रात्री उशीरा नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
अफगाणिस्तानमधील हा तरुण येवल्यात का आला? चिचोंडी एमआयडीसी परिसरात हत्या का झाली? कशासाठी झाली? याचा तपास पोलिस करत आहेत. तसंच, घटनास्थळी एका भूखंडावर नारळ फोडून, अगरबत्ती लावून, कुंकू डबी सापडली आहे. यावरून अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

नाशिकमध्ये खुनाच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये प्राणघातक हल्ले वाढले आहेत. अंबड भागात रात्री एका तरुणावर चाकून वार करण्यात आला. या हल्ल्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्रे आलम (वय २२) हा बिहारचा असून कामानिमित्त नाशिकमध्ये आला होता. या तरुणावरील हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळं शहरात दहशत पसरली आहे. शहरातील हा दहावा खून आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button