breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

गुन्हेगारी वर्चस्व राखण्यासाठी कुख्यात अविनाश धनवेचा खून, चार जणांना अटक

पुणे | पुण्यातील इंदापूरमध्ये शनिवारी धक्कादायक घटना घडली होती. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या जगदंबा हॉटेलमध्ये मित्रांसह जेवायला गेलेल्या तरुणावर गोळीबार करीत कोयत्यांनी वार करीत त्याचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह इंदापूर पोलिसांनी केलेल्या तपासात चार जणांना अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या दिशेने पळून जात असलेल्या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हेगारी वर्चस्व राखण्याच्या वादातून प्रतिस्पर्धी टोळीने हा खून केल्याचे समोर आले आहे. अविनाश बाळू धनवे (वय ३४, रा. आळंदी) असे खून झालेल्याचे नाव आहे. शिवाजी बाबुराव भेंडेकर (वय ३५, रा. पद्मावती रोड, साठेनगर, आळंदी देवाची), मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय २०, रा. आंबेडकर चौक, आळंदी देवाची), सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे (वय २०, रा. सोपानजाई पार्क, आळंदी देवाची), सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय २२, रा. मरकळ रोड, सोळू, ता. खेड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा    –    WPL चॅम्पियन बनल्यानंतर बंगळूरूच्या टीमवर पडला पैशांचा पाऊस! 

याप्रकरणी पुजा अविनाश धनवे हिने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात भादवि कायदा कलम ३०२, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९, १०९, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५, २७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button