breaking-newsराष्ट्रिय

शहा ज्यादा खा गया

हॅश टॅग वापरून राहुल गांधींची अमित शहांवर टीका 
नवी दिल्ली – नोटबंदीच्या काळात केवळ पाच दिवसांत अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद बॅंकेत सर्वाधिक जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. या काळात तब्बल साडे सातशे कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत अशी माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली असल्याने कॉंग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi

@RahulGandhi

Congratulations Amit Shah ji , Director, Ahmedabad Dist. Cooperative Bank, on your bank winning 1st prize in the conversion of old notes to new race. 750 Cr in 5 days!

Millions of Indians whose lives were destroyed by Demonetisation, salute your achievement.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शहा ज्यादा खा गया असा हॅशटॅग वापरून अमित शहांना त्यांच्याच भाषेत लक्ष्य केले आहे. अमित शहा हे राहुल गांधी यांचा उल्लेख सातत्याने शहाजादा असा करीत आहेत त्यावरून अनुप्रास साधत राहुल गांधींनी त्यांना लक्ष करताना म्हटले आहे की, अमित शहाजी तुमचे अभिनंदन. तुम्ही संचालक असलेल्या अहमदाबाद सहकारी बॅंकेने पाच दिवसांत साडे सातशे कोटींच्या जुन्या नोटा बदलून देऊन देशात पहिल क्रमांक मिळवला आहे. या सर्वोत्तम कामगिरीबद्दल तुमचे अभिनंदन.

दरम्यान त्या आधी कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन अहमदाबाद सहकारी बॅंकेतील या नोटबंदीच्या काळातील व्यवहाराची माहिती जाहीर करीत अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 15 नोव्हेंबर या काळात अहमदाबाद सहकारी बॅंकेत एकूण 745 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत हा पैसा कोणाचा आहे हे उघड करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button