“नरेंद्र मोदी देशाची प्रमुख संपत्ती” ; शशी थरूर यांच्याकडून पंतप्रधानांची पुन्हा स्तुती

Shashi Tharoor : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ वर लिहिलेल्या एका स्तंभात त्यांनी पंतप्रधान मोदींना भारतासाठी एक प्रमुख संपत्ती म्हणून वर्णन केले आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदींची ऊर्जा, सक्रियता आणि इच्छाशक्तीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बळकटी मिळाली आहे. यापूर्वीही त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते, त्यानंतर ते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
शशी थरूर यांनी लिहिले की, “पंतप्रधान मोदींची ऊर्जा, गतिमानता आणि सहभाग घेण्याची तयारी यामुळे भारत जागतिक स्तरावर एक मजबूत स्थानावर पोहोचला आहे. ते भारतासाठी एक प्रमुख संपत्ती आहेत, परंतु या मोहिमेला अधिक पाठिंब्याची आवश्यकता आहे.” त्यांनी असेही म्हटले की ऑपरेशन सिंदूर ही परदेशात भारताची प्रतिमा मजबूत करण्याची एक उत्तम संधी आहे.
हेही वाचा – युद्ध तुम्ही सुरू केले शेवट आम्ही करू; इराणचा इजराइल इस्रायल नंतर थेट अमेरिकेला इशारा
शशी थरूर यांनी आपल्या स्तंभात, “या मोहिमेतून त्यांना कळले की भारताला पुढे नेण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत. पहिला- एकतेची शक्ती, दुसरा- स्पष्ट आणि प्रभावी संवाद, तिसरा- सॉफ्ट पॉवरचा योग्य वापर आणि चौथा- दीर्घकालीन विचार आणि परराष्ट्र धोरण.” असे म्हटले आहे.
यासोबतच, त्यांनी असे सुचवले की भारताने आपल्या जागतिक रणनीतीमध्ये तीन गोष्टींवर भर द्यावा. पहिला- तंत्रज्ञान, दुसरा- व्यापार आणि तिसरा- परंपरा. काँग्रेसमधील काही नेत्यांनीही ऑपरेशन सिंदूरमध्ये शशी थरूर यांच्या सहभागाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते, परंतु त्यांनी स्पष्ट केले की त्यांचे उद्दिष्ट फक्त भारताची प्रतिमा मजबूत करणे आहे.