युद्ध तुम्ही सुरू केले शेवट आम्ही करू; इराणचा इजराइल इस्रायल नंतर थेट अमेरिकेला इशारा

Iran vs Donald | शनिवारी रात्री अमेरिकन लष्कराने इराणवर मोठा हवाई हल्ला चढवला. अत्याधुनिक B-2 स्टील्थ बॉम्बर्सच्या सहाय्याने इराणमधील तीन महत्त्वाच्या आण्विक तळांवर हल्ला करण्यात आला. फोर्डो (Fordow), नातांझ (Natanz) आणि एसफहान (Isfahan) या ठिकाणांवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे इराणच्या आण्विक कार्यक्रमाला मोठा झटका बसला आहे.
GBU-57A/B सुपर बाँबचा वापर; जमिनीखालील तळ उद्ध्वस्त
ही आण्विक स्थळे जमिनीच्या खोल स्तरांमध्ये असल्याने, अमेरिकेने GBU-57A/B Massive Ordnance Penetrator नावाच्या भु-भेदी बाँबांचा वापर केला. या बाँबांची क्षमता जमिनीखाली खोलवर लक्ष्य भेदण्याची असल्याने तिन्ही तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा : पुढील एकदिवसीय विश्वचषकात विराट, रोहितचा सहभाग अवघड; सौरभ गांगुलीचं मोठं वक्तव्य
इराणचा संताप, अमेरिकेला थेट युद्धाची धमकी
या हल्ल्यांनंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला थेट इशारा देत, “युद्ध तुम्ही सुरू केलं आहे, शेवट आम्ही करू,” असा इराणचा संतप्त इशारा आला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी अमेरिकेला “इतिहासात आजवर कधीच भोगावे लागले नाही असे नुकसान भोगावे लागेल,” असे विधान करून युद्धाचे संकेत दिले आहेत.
मध्यपूर्वेत युद्धाची शक्यता, भारतालाही फटका?
या घटनांमुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती, व्यापारसंबंध आणि सुरक्षेच्या दृष्टीने या संघर्षाचे पडसाद उमटू शकतात. भारतावरही त्याचे प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.