मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर महापालिकेकडून हातोडा
पालिकेने जैन मंदिरावर केलेल्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून शनिवारी अहिंसक रॅली काढण्यात आली

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून हातोडा फिरवत ते जमीनदोस्त करण्यात आले होते. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या या कारवाईनंतर मुंबईत जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – दोन हजार रुपयांहून अधिकच्या UPI Payment वर खरंच जीएसटी लागणार का? सरकारनं जारी केलं पत्रक
पालिकेने जैन मंदिरावर केलेल्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून शनिवारी अहिंसक रॅली काढण्यात आली असून यामध्ये मोठ्या संख्येने जैन समुदायातील महिला आणि पुरूषांचा सहभाद दिसत आहे. ‘मंदिर तुटा, हौसला नाही,’ असे बोर्ड हाती घेऊन शनिवारी सकाळी ९ वाजेपासून जैन समाजाकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी पालिकेकडून कारवाई करण्यात आली त्याच जागेवर पुन्हा पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर उभारावे अशी मागणी जैन समाजाकडून करण्यात येत आहे.