Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात

मुंबई – आज पहाटेपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून मुंबईकरांची सकाळ प्रचंड गारेगार झाली आहे. मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाच्या रिमझिम सरींनी हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 9 ते 13 जून या चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचीच सुरुवात आज पहाटे पाहायला मिळाली. मात्र या पावसामुळे मुंबईकर सुखावले आहेत.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button