भारतातील सर्वात आलिशान ट्रेन, 5 स्टार हॉटेल्ससारख्या सुविधा
बहुतेक लोकांना ट्रेनने प्रवास करायला आवडते

मुंबई : दरवर्षी लाखो पर्यटक भारतात असणारे धर्मिक स्थळे, भारतीय संस्कृती तसेच नामाकिंत ठिकाणं व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येत असतात. तेव्हा अनेक ठिकाणं फिरण्यासाठी खास करून लोकं ट्रेनचा प्रवास करतात. कारण ट्रेनचा प्रवास हा खूप आरामदायी आणि प्रत्येकाच्या बजेटनुसार अनुकूल असतो. पण भारतातील अशा काही ट्रेन आहेत ज्यातून प्रवास करताना तुम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये बसलो आहे की काय अशी आठवण येते. यात या ट्रेनचा प्रवास विमान प्रवासापेक्षा देखील खूप महाग आहे.
तुम्हाला देखील ट्रेनने प्रवास करायची आवड असेल तर तुम्ही मोठ्या उत्साहाने भारतभर प्रवास करू शकतात. अशातच तुमचं जर स्वप्न असेल की ट्रेनचा प्रवास एकदम राजेशाही आणि महाराजांसारखा व्हावा तर भारतातील या आलिशान ट्रेन्स तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतात. या ट्रेन बद्दल जाणून घेऊयात ज्या मध्ये बसण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या ट्रेन्सचे भाडे लाखो रुपये आहे. पण तुम्ही या ट्रेनने प्रवास केला की, हा अनुभव तुम्ही आयुष्यभर कधीही विसरणार नाही.
हेही वाचा : ‘सुरेश धस, धनंजय मुंडे आणि कराड एकच’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
महाराजा एक्सप्रेस
महाराजा एक्सप्रेस ही एक अतिशय आलिशान ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये २३ कॅरीज-लॉन्ग ट्रेन हाउस आहे. या ट्रेनमध्ये जुनिया सुइट केबिन, डिलक्स केबिन, सुइट्स आणि प्रेसिडेंशियल सुइट्स सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. जर तुम्हाला आरामदायी प्रवास करायचा असेल तर या ट्रेनने आवर्जून एकदा तरी नक्की प्रवास करा. या ट्रेनचा ७ दिवसांच्या प्रवासासाठी तुम्हाला सुमारे २१ लाख रुपये खर्च करावे लागतील.
रॉयस ओरिएंट ट्रेन
या ट्रेनमध्ये राजस्थान आणि गुजरातमधील काही खास पर्यटन स्थळांचा समावेश आहे. त्यात केबिन, वॉटरिंग होल, लायब्ररी आणि रेस्टॉरंटचा समावेश आहे. ही ट्रेन एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखी बनवण्यात आली आहे. ही ट्रेन दिल्ली, चित्तोडगड, उदयपूर, जुनागढ, भिलवाडा, सरखेज, अहमदाबाद, जयपूर मार्गे दिल्लीला तुम्हाला पोहचवते. यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला 7 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो.
पॅलेस ऑन व्हील्स
तुम्हाला जर राजस्थानची रॉयल्टी अनुभवायची असेल तर पॅलेस ऑन व्हील्स ट्रेनमध्ये चढा. ही ट्रेन एखाद्या राजवाड्यासारखी आहे, आलिशान सुट, भरगच्च जेवणाचा आस्वाद घेता येईल आणि महाराजासारखी सेवा. प्रवाशांसाठी आलिशान केबिन, स्टॉक बार, स्पा आणि लायब्ररीची व्यवस्था देखील या ट्रेनमध्ये करण्यात आली आहे. या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये खर्च करावे लागतील.