ताज्या घडामोडीमुंबई

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला, होळीआधीच दुसरी उष्णतेची लाट

मुंबई व उपनगर तसेच कोकणपट्ट्यात उष्णतेचा येलो अलर्ट

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून होळीआधीच दुसरी उष्णतेची लाट आली आहे . बहुतांश ठिकाणी पारा ३६ अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. राज्यात सर्वाधिक३८.८ तापमान सोलापूरमध्ये नोंदवले गेले आहे. राज्यात येत्या पाच दिवसांत तापमानाचा उच्चांक पहायला मिळणार आहे.

तापमानाचा पारा २-४ अंशांनी वाढणार आहे. कोकण व गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ही लाट राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा,विदर्भात तापमानात वाढ झाली आहे तर कोकणात उष्णेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान चढेच असून गेल्या 24 तासांत किमान तापमानात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात किंचित घट झाली आहे.

हेही वाचा –  छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण

पुढील पाच दिवस मुंबई व उपनगर तसेच कोकणपट्ट्यात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज ( ९ मार्च ) ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. ११ मार्च पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट असून त्यानंतर हवामान उष्म व दमट राहणार आहे.

नुकताच संपलेला फेब्रुवारीचा पूर्ण महिना सरासरीपेक्षा खूप उष्ण ठरला. देशात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान २७.५८ अंश सेल्सिअस असते, मात्र यंदा ते २९.७ अंश सेल्सिअस राहिले आहे. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुस-या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे. २०२३ च्या फेब्रुवारीत २९.४४ अंश सेल्सिअस नोंद झाली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button