सीएसएमटी टॉयलेटमध्ये तरूणीने टोकाचं पाऊल उचचल्याची धक्कादायक घटना
धारधार शस्त्राने स्वतःला जखमी , हाताची नस कापून ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली.

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील टॉयलेटमध्ये एका तरूणीने टोकाचं पाऊल उचचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. I am Sorry… मला माफ करा असा मेसेज लिहीत 18 वर्षांच्या त्या तरूणीने हाताची नस कापून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या तरुणीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते. तिला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून रेल्वे स्थानकावर एकच खळबळ माजली. मात्र आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेत तिला लगचेच रुग्णालयात दाखल केल्याने तिच्यावर वेळीच उपचार झाले आणि तिचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या 18 वर्षांची ही तरूणी गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास सीएसएमटी स्थानकातील शौचालयात गेली. तेथे जाऊन तिने धारधार शस्त्राने स्वतःला जखमी केले. हाताची नस कापून ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. तेथील लोकांना ती बाथरूममध्ये सापडली, तेव्हा तिच्या बाजूलाच I am Sorry! मला माफ करा.. असा मेसेज लिहीलेला आढळला. ही तरुणी ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली येथे वास्तव्यास असल्याचे समजते.
हेही वाचा – कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना
मात्र तिने आयुष्य संपवण्याचं हे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप समजू शकलेले नाही. लोकांच्या प्रसंगावधानामुळे तिला वेळीच रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आणि तिचा जीव वाचला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र ही मुलगी कोण, ती ती काय करते आणि तिने आत्महत्या करण्याचं हे टोकाचं पाऊल का उचललं याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. सध्या तिच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.