Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांच्या वापरवर WHO ने घातली बंदी

मुंबई | कोरोना व्हायरसचे वाढते संकट लक्षात घेत त्यावर जगभरात औषधाचे संशोधन सुरु आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाबाधित रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या देत आहे. जगभरातील अनेक देशांनी या औषधांच्या वापरावर बंदी घातली आहे. आता जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने देखील याचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. कोरोनाच्या उपचारासाठी मलेरियाचे औषध वापरु नये, असे डब्लूएचओने सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने काल (२६ मे) सांगितले की, खबरदारी म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची क्लिनिकल चाचणी तात्पुरती बंद केली आहे. हा निर्णय एका रिपोर्टच्या आधारे घेतल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. या रिपोर्टमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांमुळे कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. या रिपोर्टच्या आधारावर या गोळ्यांचा वापर बंद केल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button