टीम इंडियाला फायनलमध्ये सर्वात जास्त धोका न्यूझीलंडचा युवा खेळाडू रचिन रवींद्रपासून आहे.
बॅटसोबतच चेंडूने सुद्धा तो आपल्या टीमसाठी मॅच विनिंग प्रदर्शन ,रचिन रवींद्रचा फॉर्म हा चिंतेचा विषय

पुणे : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन टीम्समध्ये खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सलग दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. पण न्यूझीलंडच्या टीमला हरवणं टीम इंडियासाठी सोप नसेल. एक भारतीय वंशाचा खेळाडूच टीम इंडियाच्या विजयाच्या मार्गात मुख्य अडथळा ठरु शकतो. न्यूझीलंडच्या टीममध्ये हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे, जो फायनलमध्ये टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतो. हा खेळाडू सध्याच्या घडीला शानदार फॉर्ममध्ये आहे. मागच्याच सामन्यात त्याने विनिंग सेंच्युरी मारली आहे.
टीम इंडियाला फायनलमझ्ये सर्वात जास्त धोका न्यूझीलंडचा युवा खेळाडू रचिन रवींद्रपासून आहे. रचिन रवींद्र मूळ भारतीय वंशाचा आहे. रचिन रवींद्रचा जन्म 18 नोव्हेंबर 1999 रोजी न्यूझीलंडच्या वेलिंग्टन शहरात झाला. त्याचे आई-वडिल बंगळुरुचे निवासी होते. रचिनच्या जन्माआधी ते न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. रचिनचे वडिल पेशाने सॉफ्टवेयर आर्किटेक्ट आहेत. रचिन रवींद्र न्यूझीलंडमध्येच लहानाचा मोठा झाला. तिथे क्रिकेटचे धडे गिरवले.
हेही वाचा – कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत त्याचं कमालीच प्रदर्शन
रचिन रवींद्रने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. भविष्यात तो क्रिकेट विश्वातील एक मोठा खेळाडू बनू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. बॅटसोबतच चेंडूने सुद्धा तो आपल्या टीमसाठी मॅच विनिंग प्रदर्शन करतोय. टीम इंडियासाठी रचिन रवींद्रचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रचिन रवींद्र आतापर्यंत 3 सामने खेळलाय. त्याने 75.33 च्या सरासरीने 226 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने दोन सेंच्युरी झळकवल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या डेब्यु मॅचमध्येच त्याने शानदार शतक ठोकलं होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये शतकी इनिंग खेळला. सोबतच गोलंदाज म्हणून 2 विकेट काढल्या.
टीम इंडिया विरुद्ध प्रदर्शन कसं आहे?
टीम इंडिया विरुद्ध रचिन रवींद्र आतापर्यंत 3 वनडे सामने खेळलाय. या दरम्यान रचिन रवींद्रने 31.33 च्या सरासरीने 94 धावा केल्या आहेत. यात एक हाफ सेंच्युरी आहे. रचिन रवींद्र भारताविरुद्ध वनडेमध्ये कोणतीही मोठी इनिंग खेळू शकलेला नाही.