अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला मोठा धक्का
स्पेसएक्स कंपनी अवकाश संशोधन क्षेत्रात काम ,एका रॉकेटची टेस्टिंग सुरु ...

अमेरिका : अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला मोठा धक्का बसला आहे. स्पेसएक्स कंपनी अवकाश संशोधन क्षेत्रात काम करते. स्पेसएक्सकडून गुरुवारी एका रॉकेटची टेस्टिंग सुरु होती. त्यांनी टेस्ट उड्डाण लॉन्च केलं. पण उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच स्टारशिप रॉकेटचा संपर्क तुटला. 123 मीटरच्या या रॉकेटचा सूर्यास्त होण्याच्या काहीवेळ आधी फ्लोरिडामध्ये स्फोट झाला. अशा ब्लास्टचा सामना करण्याची इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सची ही पहिली वेळ नाहीय. दोन महिन्यांपूर्वी सुद्धा स्पेसएक्सच्या अपेक्षांना धक्का बसला होता. दोन महिन्यांपूर्वी स्पेसएक्सच्या एका रॉकेटचा अशाच प्रकारे स्फोट झाला होता. त्यानंतर गुरुवारी स्पेसएक्सने पुन्हा एकदा स्टारशिप रॉकेट लॉन्च केलं होतं. या रॉकेटने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटात संपर्क तुटला. स्फोटानंतर रॉकेटचे तुकडे समुद्रात पडताना दिसले.
अवकाश-स्किमिंगच हे उड्डाण एक तास चालणार होतं. प्लाननुसार मॉक उपग्रह अवकाशात सोडता आले नाहीत. हे रॉकेट 150 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचलं होतं. त्याचवेळी स्फोट झाला आणि रॉकेटचे तुकडे विखुरले गेले. स्पेसएक्स फ्लाइट कमेंटेटर डॅन हुओट लॉन्च साइटवरुन बोलताना म्हणाला की, ‘दुर्देवाने मागच्यावेळी सुद्धा असच घडलं होतं’.
हेही वाचा – कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना
चंद्रावर अंतराळवीर उतरवण्यासाठी स्टारशिपची बुकिंग
नासाने या दशकाच्या अखेरीस आपल्या अवकाशवीरांना चंद्रावर उतरवण्यासाठी स्टारशिपला बुक केलं आहे. स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क हे जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तीशाली स्टारशिप रॉकेटसह मंगळ ग्रहावर जाण्याची योजना बनवत आहेत.
स्फोट कसा झाला?
रॉकेटमध्ये हा स्फोट कसा झाला? त्याची चौकशी सुरु आहे. इंधन लीक झाल्यामुळे रॉकेटने आतमध्ये पेट घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे अवकाश यानाच इंजिन बंद झालं. प्लाननुसार ऑन-बोर्ड सेल्फ-डिस्ट्रक्ट सिस्टम चालू झाली. दुर्घटनेनंतर अवकाश यानात अनेक सुधारणा केल्या आहेत असं स्पेसएक्सकडून सांगण्यात आलं. स्पेसएक्स फ्लोरिडाच्या केप कॅनावेरलमध्ये आणखी एका स्टारशिप कॉम्प्लेक्सच निर्माण करत आहे. स्पेसएक्स ही सध्याच्या घडीला अवकाश संशोधन क्षेत्रातील आघाडीची खासगी कंपनी आहे. स्पेसएक्सच्या सतत अवकाश मोहिमा सुरु असतात. नासाने अवकाश क्षेत्रात खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच धोरण आखलं आहे. त्यामुळे आजच्या घडीला अमेरिकेत अनेक खासगी कंपन्या अवकाश संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत.