TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मंजूर केलेला जामीन रद्द ; ईडीची सुधारित याचिकेद्वारे मागणी 

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मंजूर केलेला जामीन रद्द करून त्यांना पुन्हा कोठडीत पाठवण्याचे आदेश द्यावेत. शिवाय, राऊत यांना जामीन मंजूर करताना विशेष न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे किंवा केलेल्या टिप्पण्या आदेशातून काढून टाकाव्यात आणि नव्याने आदेश द्यावेत, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उच्च न्यायालयात केली आहे.

राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठीची सुधारित याचिका ईडीतर्फे बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. त्यात राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना जामीन मंजूर करताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी बरीच निरीक्षणे नोंदवली आहेत. यातील काही निरीक्षणे आणि टिप्पण्या अनावश्यक आणि अधिकार क्षेत्राच्या बाहेर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या आदेशातून काढून टाकाव्यात व नवा आदेश देण्यात यावा, अशी मागणी ईडीने केली आहेत.

 राऊत यांचा या आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे सादर करूनही विशेष न्यायालयाने ते विचारात घेतलेले नाहीत. त्याची दखल घेऊन राऊत यांना जामीन मंजूर करण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द करावा आणि त्यांना पुन्हा कोठडीत पाठवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही ईडीने केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button