Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोथरुड येथे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांत स्वाक्षरी मोहिमेद्वारे मतदार जागृती

पुणे | कोथरूड विधानसभा मतदारसंघात स्वीप कक्षाच्यावतीने स्वाक्षरी मोहिमेद्वारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांत मतदार जागृती करण्यात येत असून त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजाविण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

कै.अनुसयाबाई खिलारे मॉडेल स्कूल एरंडवणे येथे ज्येष्ठ नागरिक श्रीमती विद्या खरे (वय 80 वर्ष ) यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहिमेची सुरवात करण्यात आली. यावेळी दिव्यांग कर्मचारी देखील हजर होते.

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारांना सुलभरित्या मतदान केंद्रावर मतदान करता यावे, याकरीता व्हील चेअर, रॅम्प, पाण्याची व्यवस्था, बसण्याकरीता बाकडे आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसह इतर मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊनच मतदानाचा हक्क बजावावा.

– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी.

मी १९७० पासून मतदान केंद्रात जाऊनच मतदान करीत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतच्या वेळी मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. विधानसभेच्यावेळी देखील मतदान केंद्रात जाऊनच मतदानाचा हक्क बजावणार आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्याग मतदारांनीदेखील मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावावा.

– श्रीमती विद्या खरे, विजयश्री हाउसिंग सोसायटी, कोथरूड.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button