breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

खासदार उदयनराजेंनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट ; राजकीय चर्चेला उधाण

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत. उदयनराजे यांनी स्वतः पवारांसोबतच्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता या भेटीवरून अनेक तर्कवितर्क काढले जात आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासह उदयनराजे व राज्यातील अन्य खासदार सध्या दिल्लीत आहेत .उदयनराजे बुधवारी सकाळी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन शरद पवार यांच्या घरी दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे. या दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाही. मात्र या भेटीच्या माध्यमातून येत्या निवडणुकांच्या तोंडावर सातारा जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उदयनराजे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पोटनिवडणुकीत उदयनराजे पराभूत झाले होते. राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील सातारा लोकसभेचे खासदार झाले. याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवारांची भरपावसातील प्रचारसभा चांगलीच गाजली.हा उदयनराजेंसाठी मोठा धक्का मनाला जातो. मात्र उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली असली तरी शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम आणि आदरभाव आजही त्यांच्या मनात आहे. येत्या काळात सातारा पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याने या दोन्ही नेत्याची भेट महत्वाची मानली जात आहे .

काही दिवसांपूर्वी उदयनराजे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा साताऱ्यात सुरु झाल्या होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी फलटणमधील कार्यक्रमात साताऱचा खासदार निंबाळकर यांच्या सारखा असावा असे वक्तव्य केले होते. या विधानावरून उदयनराजे नाराज झाले होते. मात्र निंबाळकर यांनी मी माढा मतदारसंघातूनच लढणार असून साताऱ्यातून उदयनराजे हेच खासदारकीसाठी योग्य आहेत, असे सांगत सारवासारव केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button