breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राहुल गांधींच्या कारवरील हल्ल्याप्रकरणी भाजप नेता अटकेत

अहमदाबाद: गुजरातमधील पूरग्रस्त भाग, बनासकांठा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीप्रकरणी भाजपच्या एका स्थानिक नेत्याला अटक करण्यात आली आहे. जयेश दर्जी असे या नेत्याचे नाव असून तो भाजपच्या युवक शाखेच्या पालनपूर विभागाचा महासचिव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’मध्ये आणखी तिघांची नावे आहेत. यांत धनेरा अॅग्रीकल्चर प्रोडक्ट मार्केट समितीचे (एपीएमसी) अध्यक्ष भगवानभाई यांचेही नाव आहे. धनेरात एपीएमसी मार्केटजवळूनच राहुल गांधी यांच्या दौऱ्याला विरोध सुरू झाला होता.
गुजरात काँग्रेस अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया आणि इतरांनी या प्रकरणाबाबतची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर जिल्हा पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला. राहुल यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा विरोध म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलनही केले.
आपल्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत भाजपला जबाबदार धरत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘भाजपच्या एका कार्यकर्त्याने माझ्या दिशेने फेकलेला मोठा दगड माझ्या सुरक्षारक्षकाला लागला. पंतप्रधान मोदी आणि आरएसएसची राजकारणाची हीच पद्धत आहे. आता याबाबत काय बोलणार अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएसवर हल्ला चढवला. ज्यांनी हे काम केले, तेच स्वत: या प्रकाराची निंदा कसे कसतील असा टोलाही राहुल यांनी लगावला.

 या घटनेबाबत राहुल गांधी यांनी ट्विट करत या हल्ल्याचा समाचार घेतला होता. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणांनी, काळे झेंडे आणि दगड अशा गोष्टींमुळे मी मागे हटणार नाही. आम्ही आमची संपूर्ण शक्ती लोकांनी मदत करण्यासाठी खर्च करू’, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button