breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी, सर्वात मोठ्या निर्णयाकडे देशाचं लक्ष

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार असून निवडणुकीबाबत न्यायालय आज काय निर्णय देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं याआधी दोनदा स्थगिती दिली आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करूनच आरक्षण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं याआधीही दिले होते. त्यावरूनच तिढा निर्माण झाला आहे. न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानं ओबीसी आरक्षित जागा वगळून अन्य वॉर्डातील निवडणुका होत आहेत. सरकारनं या निवडणुका एकतर एकत्र घ्याव्यात किंवा पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काल न्यायालयात युक्तीवाद झाला आणि आजही होणार आहे. त्यानंतर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ओबीसी आरक्षणासंदर्भातली  प्रकरणात कालही सुनावणी पूर्ण झालेली नाही. आज (15 डिसेंबर) सकाळी 11 वाजता पुढची सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारनं डेटा उपलब्ध करून द्यावा याबाबत राज्य सरकारचा युक्तिवाद आहे. निवडणुकांबाबतही कालच्या सुनावणीत युक्तिवाद झाला असून उरलेला युक्तिवाद आता आजच्या सुनावणीत होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button