breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यात आजपासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार; भारतीय हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज

पुणे : राज्यात आजपासून पुन्हा मोसमी पाऊस सक्रिय होणार आहे, असं भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. अजून अनेक ठिकाणी पावसाने प्रतिक्षा कायम आहे. काही ठिकाणी अजून ही पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. पण हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे. आजपासून पुढील पाच दिवस राज्यात काही भागांमध्ये वरुणराजी हजेरी लागणार आहे.

विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. चंद्रपुरात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. काळ्याकुट्ट ढगांमुळे ऐन दुपारी शहरात काळोख पसरला. विजांचा गडगडाटासह चंद्रपुरात अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. तर पावसामुळे सुकत चाललेल्या धान- कापूस- सोयाबीन पिकांना मात्र संजीवनी मिळाली.

हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीसांच माफी म्हणजे एक प्रकारे कबुलीच’; शरद पवार यांचा हल्लाबोल 

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सलग दुस-या दिवशी पावसानं चांगलीच हजेरी लावली.. इंदापूर शहरासह तालुक्यातील निमगाव केतकी, शेळगाव, लोणी देवकर,कौठळी या भागांत दमदार पाऊस झाला. महिनाभर दडी मारल्यानंतर २ दिवस चांगला पाऊस पडतोय. त्यामुळे उरलेला पावसाळाही असाच वरुणराजा बरसावा अशी आशा शेतकरी करताहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button