ताज्या घडामोडीराष्ट्रिय

स्वित्झर्लंडमध्ये ५ जणांच्या फ्रेंच कुटुंबाने सातव्या मजल्यावरून उडी मारली

स्वित्झर्लंड |  पोलिसांच्या भीतीने एकाच कुटुंबातील पाच जणांनी राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेतली असून यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना स्वित्झर्लंडमध्ये घडली आहे. तर यात १५ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. होम स्कूलिंग प्रकरणी पोलीस या कुटुंबाच्या घरी अटक वॉरंट घेऊन गेले होते. पोलीस येताच भीतीपोटी कुटुंबातील सदस्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मृतांमध्ये कुटुंबातील पती-पत्नी, मुलगी आणि पत्नीच्या जुळ्या बहिणींचा समावेश आहे. तर मुलगा गंभीर जखमी आहे.

हे फ्रेंच कुटुंब स्वित्झर्लंडमधील मॉट्रीक्सच्या लेक जेनेवा परिसरात राहत होते. होम स्कूलिंगप्रकरणी स्वित्झर्लंड पोलीस गुरुवारी त्यांच्या घरी अटक वॉरंट घेऊन पोहचले. पोलिसांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला मात्र कुटुंबीयांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पोलीस माघारी निघून गेले. त्यानंतर पोलिसांना या मृत्यूची बातमी कळली. मृतांमध्ये ४० वर्षीय पुरुष, त्याची ४१ वर्षांची पत्नी आणि पत्नीच्या जुळ्या बहिणींचा समावेश आहे. याशिवाय त्या व्यक्तीच्या ८ वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या १५ वर्षाच्या मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस जेव्हा घरी गेले होते तेव्हा आतून कोण आहे अशी विचारणा झाली. त्यानंतर बाहेरून आवाज आला पोलीस. पोलीस शब्द ऐकताच घरात शांतता पसरली. त्यानंतर पोलिसांनी बराच वेळ बेल वाजवूनही दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे पोलीस निघून गेले, अशी माहिती पोलीस प्रवक्ते अलेक्झांड्रे बिसेन्झ यांनी दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की, अपार्टमेंटच्या बाल्कनीतून काही लोक पडले आहेत. जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा त्यांना कळले की ज्या घरातून ते परत आले त्याच घरातील लोक पडले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेवेळी अपार्टमेंटमध्ये कुटुंबातील सदस्यांशिवाय दुसरे कोणीच नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button