breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: पालघर ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे 10 नवीन रुग्ण
गेल्या दोन आठवड्यापासून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना संसर्गाच्या एकही नवीन रुग्ण आढळला नसताना काल रात्री आलेल्या अहवालांमध्ये जिल्ह्या ग्रामीण भागात दहा नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये पालघर तालुक्यात आठ नागरिकांना तर डहाणू तालुक्यात वैद्यकीय सेवेत असलेल्या करोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे.