breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

मान्सून ६ दिवसांनी लांबला, वाचा हवामानाचे नवे अपडेट्स

पुणे : राज्यात सध्या सगळेचजण मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. पण मान्सूनचा प्रवाह अरबी समुद्रावर कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे भारताच्या काही भागांवर त्याची प्रगती आता जवळपास सहा दिवसांनी लांबली आहे, असं हवामान खात्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी सोमवारी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं. मान्सून कमकुवत झाल्याने, हंगामासाठी देशभरातील पाऊस ३८% कमी होण्याची शक्यता असल्यची माहिती IMD ने दर्शविले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या मध्यवर्ती भागांमध्ये अँटी-चक्रीवादळाची उपस्थितीसुद्धा मान्सूनच्या प्रगतीसाठी चांगलं लक्षण नाही. यामुळे मान्सून सामान्य राहत नाही. देशाच्या काही पावसाच बदल होताना दिसत आहे. कारण, अरबी समुद्रातील प्रवाह खूपच कमकुवत आहे. मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळला असल्यामुळे राज्यात पावसाचे अद्याप काहीही संकेत नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला. पण तोही हवा तसा झाला नाही.

  • काय आहे हवामानाचा अंदाज?

दक्षिण कोकणात बुधवारपासून तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल. यावेळी वाऱ्यांचाही वेग वाढलेला असेल, असा अंदाज आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे. तर औरंगाबाद आणि जालना येथे बुधवारी आणि गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी पावसाचा जोर कमी होईल असाही अंदाज आहे. विदर्भात मंगळवार आणि बुधवारी वर्धा, चंद्रपूर, गोंदिया येथे तर गुरुवारी चंद्रपूर येथे उष्णतेच्या लाटेची लहर येऊ शकते. गोंदियामध्ये सोमवारी कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ब्रह्मपुरी येथे ४५.२ तर नागपूर येथे ४५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाचा पारा नोंदला गेला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button