breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावादात सुषमा अंधारेंची उडी; अमृता फडणवीसांचे फोटो केले शेअर

एखाद्याला मारण्याची भाषा जात, धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?
मुंबई : सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. यावादात आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उडी घेतली आहे. सुषमा अंधारेंनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्री केतकी चितळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावत खोचक सवाल केला आहे.
मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट. पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…
अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?
उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का?
नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल, असं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button