breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मारुंजीत एकाचा खून, पोलिसांना मृतदेहाची ओळख पटेना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मारुंजी येथील कोलते पाटील सोसायटीलगतच्या मोकळ्या मैदानावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 4) सकाळी निदर्शनास आला आहे.

मारुंजी येथील मोकळ्या मैदानात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी मिळाली. त्यावर बुधवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्याच्या बाजुलाच बिअरच्या बाटल्या पडलेल्या होत्या. दारू पीत असताना झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. अद्यापर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नसल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी नुकतीच सांगितली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button