breaking-newsराष्ट्रिय

AIIMS मध्ये होणार कोरोना व्हॅक्सीन CONAVAXIN वरील सर्वात मोठं ह्यूमन ट्रायल

नवी दिल्ली : एम्सच्या समितीने कोविड-१९ च्या स्वदेशी विकसित कोविड व्हॅक्सीन Conavaxin ला मानवी चाचणीकरता शनिवारी परवानगी दिली आहे. एम्स परीक्षणाकरता इच्छुक असलेल्या निरोगी सहभागी लोकांचे सोमवारपासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. कोवाक्सिनच्या मानवी चाचणीत पहिल्या आणि दुसऱ्या चरणातील परीक्षणाकरता भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदने दिल्लीत असलेल्या एम्ससह १२ संस्थांना यामध्ये सहभागी करून घेतलं आहे. पहिल्या चरणात ३७५ लोकांवर याची चाचणी होणार आहे. यामधील १०० लोकं ही एम्समधील असतील. 

एम्समधील सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसीनमध्ये असलेले प्रोफेसर डॉ. संजय राय सांगतात की,’एम्सच्या आचार समितीने covaxin च्या मानवी चाचणीला परवानगी दिली आहे. या परीक्षणात सुदृढ लोकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. ज्यांना कोविडची लागण झाली नाही तसे ज्यांनी वयोमर्यादा ही १८ ते ५५ या गटातील असेल असांचा समावेश केला जाणार आहे.’

तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अगोदरच काहींनी रजिस्ट्रेशन केलं आहे. सोमवारी सगळ्यांवर ही मानवी चाचणी होण्याची सुरू होणार आहे. या संदर्भातील माहिती त्यांच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. ही साखळी तोडण्यासाठी अनेक स्तरांमधून विविध उपाय राबवले जात आहेत. तरी देखील कोरोनाचा उद्रेक थांबत नसल्याचं चित्र संपूर्ण जगासमोर आहे. गेल्या काही महिन्यांपासून फैलत असलेल्या कोरोना विषाणूमुळे देशाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. सर्वच देश या महामारीमुळे आलेल्या संकटांना तोंड देत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button