breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोदी सरकारला सत्तेची मस्ती; त्यामुळे सामान्यांचा आवाज ऐकु येत नाही – सचिन साठे

पिंपरी / महाईन्यूज

मोदी सरकारला सत्तेची मस्ती आहे त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचा आवाज ऐकू येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्यातेलाचे दर कमी होत असताना केंद्र सरकार मात्र पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवत आहे. महाराष्ट्रात तर पेट्रोल शंभर रुपये लिटर पेक्षा जास्त महाग झाले आहे. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होत आहे. याची झळ सामान्य जनतेला बसत आहे. या भाववाढीवर नियंत्रण मिळवले नाही, तर कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आणखी तीव्र आंदोलन करतील असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी दिला.

इंधन व भाववाढीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने सोमवारी (दि. 7 जून) शहरात विविध ठिकाणी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे निलख येथिल भारत पेट्रोलियमच्या पंपासमोर, भोसरी येथे संभाजीनगर येथिल पंपासमोर भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे यांच्या नेतृत्वाखाली, पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली दापोडी येथे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली डांगे चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला शहराध्यक्ष गिरीजा कुदळे, महाप्रदेश कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष जितेंद्र देहाडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम आगरवाल तसेच शहाबुद्दीन शेख, मयुर जयस्वाल, सुनिल राऊत, अक्षय शहरकर, विशाल कसबे, मकरध्वज यादव, गौरव चौधरी, चंद्रशेखर जाधव, माधव पुरी, प्रविण पवार, वैभर किरवे, सुरेश बारणे, नितीन पाटील, संदेश बोर्डे, लक्ष्मण रुपनर, समाधान सोरटे, हिरामण खवळे, बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.

यावेळी साठे म्हणाले की, केंद्र सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याऐवजी भाववाढ करुन त्रास देऊन कात्रीत पकडण्याचा प्रकार केला आहे असे साठे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button