breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

वेगवान गोलंदाज रॉबिन्सनचे आंतरराष्ट्रीय सामन्यातून निलंबन

लंडन – न्युझीलंड विरूद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात पदार्पण करणार्‍या वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनवर इंग्लंड-वेल्स क्रिकेट बोर्डाने वादग्रस्त ट्विट प्रकरणी कारवाईचा बडगा उगारुन आंतरराष्ट्रीय सामन्यांतून निलंबनाची कारवाई केली. 2012-2013 मध्ये रॉबिन्सनने अक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यामध्ये विशिष्ट धर्मातील लोकांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे म्हटले होते. त्यात महिला-आशियाई वंशाच्या लोकांबाबत देखील अपमानास्पद भाष्य केले होते.

त्याचे हे ट्विट सामना सुरू होण्यापूर्वी व्हायरल झाले त्याप्रकरणी त्यांनी माफी देखील मागितली होती. परंतु आता शिस्तभंग चौकशीचा निकाल लागेपर्यंत रॉबिन्सनला इंग्लंडतर्फे कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळता येणार नाही. त्याने आपल्या पहिल्या कसोटीत 7 बळी घेतले होते. आता न्युझीलंड विरूद्ध गुरुवारपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यात तो इंग्लंड संघात नसेल. लवकरच आपल्या कौंटी इसेक्स संघात रॉबिन्सन दाखल होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button