breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नवाब मलिक प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महायुतीला टोला

मुंबई : नवाब मलिक विधीमंडळाच्या अधिवेशनात सहभागी झाले. ते सत्ताधारी आमदारासोबत जाऊन बसले. यानंतर विरोधी पक्षांनी भाजपाला कोंडीत पकडलं आहे. नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, अशा आशयाचं पत्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलं आहे. यावरून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्वीट करत महायुतीवर निशाणा साधला आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सर्व नेते हसत असल्याचं दिसतंय. या फोटोद्वारे पटेल यांनी महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा  –  मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले, २४ डिसेंबर नंतर..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? ‘नवाब’चा ‘जवाब’ द्या किंवा नका देऊ, पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या ‘नकाब’चा ‘जवाब’ मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल. नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल, असं मनसेनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button