breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

बाबाराजे देशमुखवर ७० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या नत्यांचे वाभाडे काढणाऱ्या आणि बिनधास्त बोलणाऱ्या मावळमधील प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला शिरगाव पोलिसांनी अटक देखली केली आहे. २०१३ ते २०२० च्या दरम्यान ७० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाराजेची मावळच्या बेबडओव्हाळमध्ये गट नंबर १९६ या ठिकाणी असलेली पाच एकर जमीन वनीकरण विभागात समाविष्ट आहे. त्या जागेत प्लॉटिंग होत नाही. हे माहित असतानादेखील त्याने तक्रारदार यांना २५ गुंटे जागा २५ लाखांत विकली. त्याचे खरेदीखत न करीता आर्थिक फसवणूक केली. असे तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा – ४५ दिवसांत कुस्ती महासंघाच्या निवडणुका घ्या, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा मोठा निर्णय

खरेदी खत करायचे असेल तर आणखी ७० लाख रूपये खंडणी मागून ते न दिल्यास किंवा पोलिसांना याची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याला घाबरून तक्रारदार यांनी बाबाराजेला पाच लाख रूपये दिले. या प्रकरणी बाबाराजेला शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button