breaking-newsआंतरराष्टीय

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पोलीस पथकावर हल्ला, चार जण शहीद

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस शहीद झाले आहेत. तर एक पोलीस जखमी झाला आहे. शोपियनमधील अरहामा येथे हा हल्ला झाला आहे.

बुधवारी दुपारी अरहामा भागात गस्तीसाठी निघालेल्या पोलिसांची गाडी खराब झाली होती. रस्त्याच्या कडेला गाडी दुरूस्त करत पोलिस थांबले होते. बेसावध असलेल्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार पोलिस शहीद झाले आहेत. तर एक जण जखमी झाला आहे. इशफाक अहमद मीर,  जावेद अहमद भट्ट,  मोहम्मद इकबाल आणि आदिल मंजूर भट्ट अशी शहीद झालेल्या पोलिसांची नावे आहेत. पोलिसांनी या गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

View image on TwitterView image on Twitter

हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला आहे. दहशतवाद्यांचा  शोध घेण्यासाठी अरहामा भागात सध्या शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.  घटनास्थळावरून दहशतवाद्यांनी पोलिसांचा शस्त्रसाठा चोरला आहे.

बुधवारी सकाळी अनंतगनमध्ये भारतीय लष्कारांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button