breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे शहरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी द्या, मनसेची मागणी; नेमकं कारण काय?

पुणे : १ ऑगस्ट ला लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि आण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गौरसोय होऊ नये यासाठी शाळांना सुट्टी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. मनसेने शिक्षण आयुक्तांना या संदर्भातील निवोदन दिले आहे.

सकाळी सहापासून दुपारी तीनपर्यंत आवश्यकतेनुसार रस्ते बंद राहतील, अशा पोलिसांच्या मोघम आदेशामुळे मंगळवारी शाळा-महाविद्यालयांमध्ये, नोकरीसाठी बाहेर पडायचे की नाही, याबाबत पुणेकरांमध्ये मोठ्या प्रामाणात संभ्रम निर्माण आहे. बहुसंख्य शाळा या सकाळ-दुपारच्या असलेल्याने स्कूल व्हॅन, रिक्षाने येणारे विद्यार्थी अडकून पडणार का, अशी भीती पालकांमध्ये आहे.

हेही वाचा – ‘शरद पवार म्हणजे जपानी बाहुली..’; नितीन गडकरींचं विधान चर्चेत

पुण्यातील वाहतुकीत बदल?

१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा. ते दुपारी ३ वा. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button