breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

रेडमी स्मार्ट बँडची भारतात एन्ट्री, किंमत जाणून घ्या


नवी दिल्ली – शाओमीचा सब ब्रँड रेडमीने भारतात आपला पहिला स्मार्ट बँड लाँच केला आहे. Redmi Smart Band एक स्वस्त फिटनेस बँड आहे. याची डिझाईन एमआय बँड्सपेक्षा थोडी वेगळी आहे. रेडमी स्मार्ट बँडची किंमत देशात १५९९ रुपये आहे. फिटनेस बँडला Mi.com, अॅमजॉन इंडिया, मी होम स्टोर्स आणि मी स्टूडियोज़ वरून ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता खरेदी करता येईल.

रेडमी स्मार्ट बँडला ग्रीन, ब्लॅक, ब्लू आणि ऑरेंज कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. मी बँड ४ आणि मी बँड ३ पेक्षा रेडमीचा बँड एक रॅक्टँग्यूलर डिस्प्ले दिला आहे.

Redmi Smart Band:चे वैशिष्ट्ये
रेडमीच्या या बँडमध्ये १.०८ इंचाचा एलसीडी कलर डिस्प्ले दिला आहे. युजर्सला ५० हून अधिक पर्सनलाइज्ड डायल निवडण्याची संधी आहे. रेडमी स्मार्ट बँड मध्ये एक हार्ट रेट मॉनिटर आहे. हे बँड 5ATM सर्टिफिकेट सोबत येतो. म्हणजेच ५० मीटर पाण्यात १० मिनिटासाठी राहिल्यानंतर सुद्धा खराब होत नाही. रेडमी स्मार्ट बँकसंबंधी कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जमध्ये बॅटरी १४ दिवसांपर्यंत चालते. या बँडमध्ये एक डायरेक्ट यूएसबी चार्जिंग आहे. म्हणजेच कोणत्याही अडेप्टर पॉवर बँक किंवा लॅपटॉप मध्ये थेट प्लग करू शकता येते.

रेडमी स्मार्ट बँड मध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ५.० आहे. हे अँड्रॉयड ४.४ किंवा याच्यावर आणि आयओएस ९.० किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जनच्या डिव्हाईसला सपोर्ट करते. रेडमी बँड चा हा पहिला फिटनेस बँड आहे. ज्याला कंपनीने भारतात लाँच केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button