breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यंदा गणेश मुर्तीची उंची 4 फुटांपर्यंतच ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश…

कोरोना व्हायरसमुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका यंदाच्या गणेशोत्सवाला देखील बसला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधापणाने साजरा करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होत…मात्र आता मुख्यमंत्र्यांनी गणेश मुर्तीं बाबत महत्त्वाची एक सुचना जारी केली आहे…या सुचनेनुसार गणेश मुर्तीची उंची ४ फुटांपर्यंतच ठेवावी, अशी सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेश मंडळांना केली आहे. गणेशोत्सवात कोठेही लोकांची गर्दी होणार नाही यांचीही दक्षता घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांना केले आहे.

भव्य आणि उंच गणेशमूर्ती ही मुंबई गणेशोत्सवाची ओळख आहे. पण करोनामुळे यंदाचा उत्सव साधेपणाने व सुरक्षितरित्या पार पाडावा म्हणून गणेशमूर्तींच्या मूर्तींबाबतचा मुद्दा पुढे आला होता. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी चर्चा करून भव्य मूर्तीऐवजी ४ फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी असा पर्याय पुढे आला व तो एकमताने सर्वांनी मान्य केला आहे. मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल इतकच.

शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडपदेखील लहान आणि साधेच पण सुंदर असतील. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक मंडळांना केले आहे. मुंबईतील दहीहंड्याही यंदा रद्द केल्या आहेत.




Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button