breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शरद पवार म्हणजे जपानी बाहुली..’; नितीन गडकरींचं विधान चर्चेत

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या दिलखुलास आणि खास शैलीतल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भाजपाचा नागपूर ग्रामीण कार्यकर्ते मेळावा होता. त्यात बोलत असताना गडकरींनी शरद पवारांना जपानी बाहुलीची उपमा दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

नितीन गडकरी म्हणाले की, पान ठेल्यावर एक जपानी गुडिया असते. कुणी कुठल्याही दिशेने असलं तरी ती डोळा मारायची. पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटायचं की ती माझ्याकडे पाहूनच डोळा मारते. शरद पवारही अगदी असेच आहेत. प्रत्येकाला पाहतात तेव्हा प्रत्येकाला वाटतं की त्यांनी मलाच डोळा मारला. मग कार्यकर्ते कामाला लागतात, पुढच्या वेळी मीच असं त्यांना वाटत असतं आणि भलत्यालाच तिकीट मिळतं.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर, शहरातील वाहतुकीत बदल

माझ्याकडे परवा अमूल कंपनीचे अध्यक्ष आले होते. त्यांच्या बरोबर सिर्त्झंलडमधल्या चॉकलेट कंपनीचे मालक आले होते. जो स्वीस मालक होता त्याची पत्नी भोपाळची आहे. तिचं आडनाव शर्मा, मला त्यांनी खूप चॉकलेट्स आणून दिले. त्यावर मी गंमतीने त्या स्वीस चॉकलेट कंपनीच्या मालकाला सांगितलं की हे चॉकलेट्स माझ्यासाठी खूप उपयोगाचे आहेत. तर त्यांनी मला विचारलं की तुम्हाला चॉकलेट्स आवडतात का? मी म्हटलं हो चॉकलेट्स मला आवडतातच. पण या चॉकलेट्सचे खूप फायदे आहेत. तर त्या मालकाने मला विचारलं कसं काय? त्यावर मी म्हणालो मी आता लोकांना वाटणार आहे. जो जो चॉकलेट चघळेल तो तो म्हणेल काय बेस्ट चॉकलेट आहे गडकरींनी दिलं आहे. असं म्हणत भन्नाट किस्साही नितीन गडकरींनी सांगितला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button