TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार लक्ष्मण जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्का; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल यांचा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

पिंपरी |  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपळेगुरवमध्ये राजकीय धक्का दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल आणि त्यांचा मुलगा अमर आदियाल यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ६) भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाच्या माध्यमातून आमदार लक्ष्मण जगताप हे येत्या काही दिवसांत चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक राजकीय धक्के देण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत.

शोभा आदियाल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. पिंपळेगुरवमधील सुदर्शननगर भागाचे २००७ ते १२ या काळात त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांनी आपला मुलगा अमर आदियाल यांच्यासह रविवारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. पिंपळेनिलख येथे शोभा आदियाल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचेही पक्षात स्वागत केले. शोभा आदियाल यांच्या प्रवेशामुळे पिंपळेगुरव व सुदर्शननगरमध्ये भाजपचे राजकीय बळ वाढणार आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी शोभा आदियाल यांचा भाजप प्रवेश घडवून आणत पिंपळेगुरव भागात राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिल्याचे मानले जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विरोधी पक्षाच्या अनेकांची अक्षरशः रांग लागलेली आहे. ही रांग भली मोठी असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश हा चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी राजकीयदृष्ट्या फार सूचक मानला जात आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विरोधी पक्षातील अनेकांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची घोषणा होईपर्यंत चिंचवड मतदारसंघातील अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी आमदार लक्ष्मण जगताप हे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीला आणखी कोणकोणते राजकीय धक्के देतात याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button