breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

ललित पाटील प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्यासह दोन जण बडतर्फ

पुणे:ड्रग्स माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे यांच्यासह सहायक फौजदार रमेश जनार्दन काळे या दोघांना बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा  –  आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सरकारकडून SIT चौकशी

यापूर्वी पोलीस नाईक नाथाराम भारत काळे आणि अमित सुरेश जाधव या दोघांना बडतर्फ करण्यात आले होते. या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक देखील केली होती. डोंगरे आणि काळे यांच्यावर कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाया आहे. या कारवाईमुळे पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button