breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या भेटीला

मुंबई |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातील निकालानंतर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री न्यायमूर्तींच्या भेटीसाठी आले असल्याची माहिती आहे. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर जो राजकीय पेच महाविकास आघाडीच्या सरकारपुढे निर्माण झालाय. त्याबाबत नेमका काय मधला मार्ग काढता येईल, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्यादरम्यानची भेट ही सदिच्छा भेट असल्याची माहिती, न्यायालय प्रशासनाने दिली आहे.

  • ओबीसी आरक्षण- कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे सरकारससमोर पेच, मार्ग काढण्यासंबंधी भेटीत चर्चेची शक्यता

राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या (Local Body Election) निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दिल्या आहेत. उच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका मानण्यात येतोय. ओबीसी आरक्षणाच्या कोर्टाच्या निर्णयानंतर जो राजकीय पेच महाविकास आघाडीच्या सरकारपुढे निर्माण झालाय त्याबाबत आता नेमका काय मधला मार्ग काढता येईल, याबाबत मुख्यमंत्री आणि न्यायमूर्ती यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • मुख्यमंत्री-न्यायमूर्तींच्या भेटीची चर्चा

मुख्यमंत्री आणि न्यायमूर्ती यांच्या भेटीची मोठी चर्चा जरी होत असली तरी याअगोदरही मुख्यमंत्री-न्यायमूर्ती यांच्यादरम्यान दोन ते तीन वेळा भेटी झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी दोन वेळा मुंबई उच्च न्यायालयात येऊन मुख्य न्यायमूर्तींची भेट घेतलीये. तर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनीही सह्याद्री-वर्षा येथे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अशा भेटी वरचेवर होत असतात.

  • मुख्यमंत्री-न्यायमूर्तींच्या भेटीमागचं कारण काय?

मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमित कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. पुढचा महिनाभर म्हणजेच जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उच्च न्यायालय हे उन्हाळ्याच्या सुट्टी निमित्त बंद असणार आहे. फक्त सुट्टीकालीन न्यायालयाचं कामकाज सुरू राहिल. आज कामकाजाचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्तींची भेट घेण्यासाठी आजचा दिवस निवडल्याचं बोललं जात आहे. कुठलंही विशेष कारण स्पष्ट करण्यात येत नाहीये.

पण, गेल्या काही दिवसात खासदार संजय राऊत यांनी उघडपणे न्यायव्यवस्थेवर जी टीका केली होती. त्यासाठी एका वकील संघटनेने शिवसेना खासदारांसह, मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, यांच्याविरोधात अवमान केल्याबाबत कारवाईची मागणी करत जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरही मुख्यमंत्री आणि न्यायमूर्तींमध्ये चर्चा होऊ शकते, तशी शक्यता व्यक्त केली जातीये.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button