breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

अपघात किंवा मृत्यू झाल्यास ग्रॅच्युइटी दिली जाते का?

Gratuity Payment : ग्रॅच्युइटी ही कंपनी कर्मचाऱ्याला बक्षीस म्हणून दिलेली रक्कम असते. सोप्या शब्दात बोलायचे तर ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीत दीर्घकाळ काम केल्याचे बक्षीस असून ते एका निश्चित सूत्रानुसार दिले जाते. एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीत पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्तीवर ग्रॅच्युइटी मिळते.

जर त्या कर्मचाऱ्याने कंपनी सोडून इतरत्र जॉइन केले तरी त्याला ग्रॅच्युइटीचे पैसे दिले जातात. याशिवाय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तरी ग्रॅच्युइटीची रक्कम कंपनी किंवा नियोक्त्याकडून पाच वर्षापूर्वी किंवा सेवानिवृत्तीपूर्वी दिली जाते.

हेही वाचा –गोपीचंद पडळकरांचा तुफान डान्स; व्हिडीओ व्हायरल

ग्रॅच्युइटी पेमेंट नियम १९७२ नुसार स्पष्ट करण्यात आले आहे की कर्मचाऱ्याच्या गरजेनुसार त्याला ग्रॅच्युटी दिले जाऊ शकत नाही. मात्र, जीवघेणा असा कोणताही आजार झाल्यास ग्रॅच्युइटीचे पैसे नक्कीच दिले जसू शकतात.

तुम्ही अपघातात अपंग झालात किंवा तुमचा जीव धोक्यात येईल अशा स्थितीत असेल तरीही तुम्ही ग्रॅच्युइटीचे पैसे काढू शकता. म्हणजे तुम्हाला उपचारासाठी देखील ग्रॅच्युइटीचे पैसे मिळू शकतात, परंतु जर तुमच्या जीवाला धोका असेल तरच. तुमची पाच वर्षे पूर्ण झाली नसली तरी तुम्ही पैसे काढू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button