breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महापौर माई ढोरे कडाडल्या : महापालिका आयुक्त शहराचे मालक नाहीत!

पिंपरी | प्रतिनिधी

जाणीवपूर्वक नागरिकांच्या हिताचे सत्ताधारी म्हणून आम्ही घेत असलेले निर्णय बाजूला टाकून आडवा आणि जिरवा अशी भूमिका आयुक्त राजेश पाटील घेत आहेत. मात्र अशी भूमिका वारंवार घेण्यात आली तर त्याची गय आम्ही करणार नाही. आयुक्त राजेश पाटील हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून नियुक्त केलेले अधिकारी आहेत. ते या शहराचे किंवा या महापालिकेचे मालक नाहीत. त्यामुळे त्यांचा असा एककल्ली कारभार कदापि खपवून घेतला जाणार नाही. कोणतेही ‘डिसिजन’ घेताना त्यांची मनमानी सुरूच राहत असेल तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील असा इशारा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ढोरे यांनी बुधवारी दिला.

पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील महिलांना मोफत वाहन प्रशिक्षण आणि लायसन देण्यात येणार आहे. यासाठी येणारा खर्च महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. मात्र हा विषय सदस्यांकडून आल्याप्रमाणे सरसकट मंजूर करण्यास आयुक्तांनी विरोध दर्शवला असून, याबाबत नव्याने निविदा काढण्याच्या सूचना आयुक्तांकडून करण्यात आल्या. यामुळे महापौर उषा ढेरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याला विरोध दर्शवत आयुक्तांचा कारभार एककल्ली असल्याचा आरोप केला. उपमहापौर हिरानानी घुले उपस्थित होत्या.

यावेळी महापौर ढोरे म्हणाल्या…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त हे राज्य शासनाकडून ‘सुपारी’. घेतल्याप्रमाने काम करत आहेत. आम्ही येथील स्थानिक पदाधिकारी आहोत. येथील नागरिकांनी आम्हाला निवडून दिले आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेणे. त्यांच्या मागण्या काय आहेत. याची माहिती घेऊन त्यानुसार काम करणे. कार्यवाही करणे हे आमचे काम आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. याच पार्श्वभूमीवर आम्ही कोविड कालावधीनंतर नागरिकांना ज्या आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे.त्यानुसार त्यांना तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा आमचा विचार आहे. त्यानुसार प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र आयुक्तांनी हा प्रस्ताव नाकारला तर दुसरीकडे महिला सक्षम व्हाव्यात यासाठी ड्रायव्हिंग लायसन आणि प्रशिक्षण देण्याचा आणखी एक प्रस्ताव होता तोदेखील आयुक्तांनी बाजूला ठेवला आहे एक प्रकारे हे जाणीवपूर्वक केले जात आहे. जाणीवपूर्वक नागरिकांच्या हिताचे आम्ही घेत असलेले निर्णय बाजूला टाकून आडवा आणि जिरवा अशी भूमिका आयुक्त घेत आहेत .

मात्र अशी भूमिका वारंवार घेण्यात आली तर त्याची गय आम्ही करणार नाही आयुक्त राजेश पाटील हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून नियुक्त केलेले अधिकारी आहेत ते या शहराचे किंवा या पालिकेचे मालक नाहीत त्यामुळे त्यांचा असा एककल्ली कारभार कदापि खपवून घेतला जाणार नाही कोणतेही डिसिजन घेताना त्यांची मनमानी सुरूच राहत असेल तर मात्र आम्हाला कठोर पावले उचलावी लागणार आहेत सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये काही निर्णय घेत असतो आणि आयुक्त मात्र त्याला केराची टोपली दाखवत असतील तर ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आयुक्त ह्या सर्व गोष्टी राज्य शासन पुण्याचे पालकमंत्री यांच्या आदेशानुसार अस करत असल्याचा गंभीर आरोप देखील महापौर ढोरे यांनी केला

आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासनिक कारकीर्द चांगली राहिलेली आहे त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत मागास असलेल्या कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारे काम केले आहे असे असताना आता पिंपरी-चिंचवड या आशिया खंडातील सर्वोत्तम आणि श्रीमंत महापालिकेमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवायचा का एखाद्याच्या दबावाखाली काम करायचे हे आता आयुक्तांनीच विचार करणे गरजेचे झाले आहे असेही महापौर म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button