breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगे भरणार शुक्रवारी उमेदवारी अर्ज

  • भाजपची उमेदवारी घोषीत होताच कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघातून आमदार महेश लांडगे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. येत्या शुक्रवारी (दि. 4) आमदार लांडगे यांचा जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आमदार महेश लांडगे यांना भाजपची उमेदवारी मिळण्याबाबत शेवटपर्यंत साशंकता होती. अखेर आज पहिल्या यादीत लांडगे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे लांडगे यांच्या कार्यकर्त्यांना सुटकेचा निश्वास मिळाला आहे. आता ओढ लागली आहे ती उमेदवारी अर्ज भरण्याची. येत्या शुक्रवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केले आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन भरवून लांडगे यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. भोसरीत पुन्हा दादांची लाट उसळणार आहे.

भोसरीतील आमदार महेश लांडगे यांच्या निवास स्थानासमोरील भाजी मंडईशेरच्या लांडगे आळीत सर्व कार्यकर्ते, दादांना माननारे नागरीक, महिला कार्यकर्त्या, भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. याठिकाणाहून निवडणूक विभाग कार्यालयापर्यंत भव्य रॅली, पदयात्रा काढून महेश लांडगे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे, असे त्यांच्या कार्यालयातून जाहीर करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button