पिंपरी / चिंचवड

बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. पराग गायकवाड यांची निवड

पिंपरी l प्रतिनिधी

भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना पुणे शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. पराग गायकवाड यांची निवड झाली आहे. संघटनेच्या पुणे शाखेचे सचिव म्हणून डॉ. दीपक मुळे आणि कोषाध्यक्ष पदी डॉ. मनोज झालटे यांची निवड झाली आहे.

भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना पुणे शाखेची निवडणूक नुकतीच पार पाडली. या निवडणुकीमध्ये डॉ. पराग गायकवाड यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या संघटनेमध्ये 750 पेक्षा अधिक सदस्य आहेत.

डॉ. गायकवाड हे मागील वर्षापासून या संघटनेच्या राष्ट्रीय पातळीवरील बालकांच्या आहार विषयक समितीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. डॉ. गायकवाड यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बालरोग तज्ज्ञ म्हणून विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना पुणे शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. पराग गायकवाड यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button