breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ वा. ना. तथा भाऊ अभ्यंकर यांचे निधन
पिंपरी / महाईन्यूज
ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे संस्थापक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. तथा भाऊ अभ्यंकर (वय 79) यांचे आज (16 फेब्रुवारी) सकाळी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले.
मागील दोन महिन्यापासून ते पक्षाघाताने आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी इंदिराबाई, कन्या, जावई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. दुपारी 4 वाजता निगडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अंत्यदर्शनासाठी पार्थिव सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत निगडी येथील ज्ञानप्रबोधिनीच्या शाळेत ठेवण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही भाऊंच्या घरी गर्दी करु नये, असे आवाहन ज्ञानप्रबोधिनी केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.