breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
म्हाडाची परीक्षा आता TCS घेणार; मंत्रीमंडळाचा निर्णय
मुंबई | प्रतिनिधी
म्हाडाच्या (MHADA) रद्द झालेल्या परीक्षेची जबाबदारी आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) वर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व प्रकारच्या भरती परीक्षा या TCS, MKCL, IBPS या संस्थांमार्फत घेण्यात येणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.