breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

‘काँग्रेसला पंतप्रधानपदात स्वारस्य नाही’; मल्लिकार्जुन खरगे याचं सूचक विधान

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्षांची बैठक काल पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी एकत्र येण्यावर एकमत झाले. विशेष म्हणजे विरोधकांच्या या आघाडीला INDIA म्हणजेच इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझीव अलायन्स असं नाव दिलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी एक सूचक विधान केलं आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीनंतर मध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सध्या भाजपा ३० पक्षांना सोबत घेऊन एनडीएची बैठक घेत आहे. मी भारतात आतपर्यंत एवढे पक्ष कधी ऐकलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांना घाबरले आहेत. आम्ही येथे लोकशाही, भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत.

हेही वाचा – राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज..

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, ही आमची दुसरी यशस्वी बैठक आहे. हुकूमशाहीविरोध आम्ही एकत्र झाले आहोत, हे तुम्ही पाहातच आहात. आम्ही आमच्या कुटुंबासाठी अशा प्रकारे एकत्र आलो आहोत, असा दावा काहीजण करत आहेत. बरोबर आहे, हा देश आमचे कुटुंब आहे. आम्ही देशरूपी कुटुंबासाठी लढत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बंगळुरूमध्ये एकूण २६ पक्ष एकत्र आले आहेत. भारताला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या जो द्वेष पसरवला जात आहे, त्यापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही देशासाठी नवे स्वप्न घेऊन येत आहोत, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button