breaking-newsमहाराष्ट्र

अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पिचकाऱ्यांनी

अकोल्याचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय गांधीगिरीमुळे सध्या राज्यभर चर्चेत आहेत. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार यांनी काल सोमवारी अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली होती. कार्यालयातील अस्वच्छतेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना चांगलंच फैलावर घेतलं. यावेळी त्यांना कार्यालयातील भिंती रंगलेल्या दिसल्या. मग, त्यांनी स्वत: बकेट आणि पाणी घेत ती भिंत साफ करायला सुरूवात केली. अस्तिक कुमार यांच्या या कृतीमुळे कर्मचाऱ्यांवर चांगलीच खजिल व्हायची वेळ आली.

ABP माझाच्या वृत्तानुसार, यावेळी त्यांना कार्यलयीन कामातील दिरंगाईही पहायला मिळाली. तसेच कार्यालयातील भिंती लालेलाल होत्या. पान, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकल्यामूळे रंगलेल्या भिंती, कार्यालयात झालेले कोळ्यांचे जाळे, धुळीने माखलेल्या फाईल पाहून जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला. अस्तिक कुमार यांनी गांधीगिरी दाखवत स्वत:च भिंत साफ करायला सुरूवात केली. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी थेट बकेट, पाणी आणि कापड मागवत स्वत: पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत स्वच्छ करायला सुरूवात केली.

कार्यालयातील भिंत जिल्हाधिकारी साफ करत असल्याचं बघताच, तेथे उपस्थित कार्यकारी अभियंता कार्यालयातील एका महिलेने ‘साहेब राहू द्या, आम्ही भिंत साफ करतो’ असे म्हणत भिंत साफ करण्याचे काम थांबवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी भिंत साफ करण्याचं काम थांबविलं.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांना कानपिचक्या देत, दोन दिवसात कार्यालयातील साफसफाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button