breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

… तरीही मुख्यमंत्री योद्ध्याप्रमाणे लढत आहेत : जितेंद्र आव्हाड

मुंबई | “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हृदयाचं ऑपरेशन झालं असताना ते एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासारखी व्यक्ती मदतीला आहेत”, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत गांभीर्याने निर्णय घेत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री वारंवार आढावा घेत आहेत. त्यांच्या याच कामांचं जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलं.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हृदयाचं ऑपरेशन झालं असताना ते एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासारखी व्यक्ती मदतीला आहेत. त्यांची आई आजारी असताना ते लोकांसाठी काम करत आहे. त्यांच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद द्यावा. काही दिवस घरी थांबा, आई वडिलांशी बोला, पुस्तकं वाचा”, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button