breaking-newsपिंपरी / चिंचवड

लॉकडाऊन काळातील वीजबील रिडिंगप्रमाणे आकारावे : शिवराज लांडगे

पिंपरी : लॉकडाऊन काळातील वीजबील सरासरी न आकारता रिडिंगप्रमाणे आकारण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे शिवराज लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. गरवारे यांना निवेदन दिले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रकाश चौधरी उपस्थित होते.

महावितरण प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, भोसरी, भोसरी  प्राधिकरण, मोशी प्राधिकरण व भोसरी MIDC  परिसरात नागरिक व कारखानदारांनी कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेक समस्या असल्याबाबत आमदार महेश लांडगे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मार्च, एप्रिल, मे व जून या (लॉकडाऊन च्या) काळात वीजबील रिडिंग घेणे बंद होते व अचानक जून महिन्याच्या अखेरीस सरासरी वीजबील महावितरण प्रशासनातर्फे जारी करण्यात आले.

त्यामध्ये व्यावसायिक, नागरिकांना वीजबील रक्कम ही भरमसाट आकारण्यात आली आहे.  आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना व कारखानदारांना सरासरी बील न आकारता रिडिंगप्रमाणे वीजबील देण्यात यावी. तसेच, ज्या नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरले आहेत. त्यांना वजा करून पुढील बिल आकारण्यात यावे. तसेच वीज बिल भरण्याकरिता सर्वांना मुदत व सवलता देण्यात यावी, अशी मागणी शिवराज लांडगे यांनी केली आहे.

महावितरणचे आधिकरी श्री. सागरे म्हणाले की, आम्ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यात साठी कटिबध्द आहोत, कोणतीही तक्रार असतील तर ऑनलाईन किंवा जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button