breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमनोरंजन

‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस धोनी’ ची लव्हस्टोरी रुपेरी पडद्यावर झळकणार!

MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता एमएस धोनी क्रीडा विश्वासोबतच मनोरंजन विश्वात देखील आपली ओळख निर्माण करत आहे. २०१६ मध्ये ‘एम.एस धोनी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत धोनीच्या भूमिकेत दिसून आला होता. अशातच आता महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित दुसरा चित्रपट येणार आहे.

आगामी एमएस धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे नाव ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ असे असणार आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये करण जोहरने ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ या सिनेमाची घोषणा केली होती. 2022 मध्ये या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

हेही वाचा – ‘काँग्रेसला पंतप्रधानपदात स्वारस्य नाही’; मल्लिकार्जुन खरगे याचं सूचक विधान

‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ या बहुचर्चित सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शरण शर्मा यांनी सांभाळली आहे. करण जोहरच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तर ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ हा सिनेमा १५ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना या सिनेमात धोनी आणि महिमा यांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button